शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

क्षीरसागर यांनी आमदार निधी खर्च केलेला ‘तो’ रस्ता दाखवावा : सत्यजित कदम यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:36 IST

कदमवाडी येथे सुमारे ७५ लाख रुपये खर्च पडलेला आमदार निधीतील रस्ता आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेवर दाखवावा, या प्रकरणापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘त्या’ निधी व रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलू नये,

ठळक मुद्देविषयांतर करून लक्ष विचलित नको; प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणारआमदार क्षीरसागर यांनी रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयावर बोलून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.

कोल्हापूर : कदमवाडी येथे सुमारे ७५ लाख रुपये खर्च पडलेला आमदार निधीतील रस्ता आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेवर दाखवावा, या प्रकरणापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘त्या’ निधी व रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलू नये, असे आव्हान महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम आणि माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच या रस्ते प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचून सत्य बाहेर काढणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

महापालिकेच्या सोमवारी (दि. २६) झालेल्या सर्वसाधारण सभेत खासगी लेआऊट विकसित करताना आमदार राजेश क्षीरसागर यांचा सुमारे ७५ लाख रुपये आमदार निधी कसा काय खर्च केला, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी आक्षेप घेत भाजपने सत्यजित कदम यांचा विधानसभा उमेदवारीचा पत्ता कट केल्याने त्यांनी आपल्यावर वैफल्यातून बिनबुडाचे आरोप केल्याचे प्रसिद्धीस दिले होते. त्याबाबत कदम यांनी बुधवारी प्रत्यक्ष ‘त्या’ वादग्रस्त जागेवर जाऊनच पत्रकार परिषद घेतली.

सत्यजित कदम व सुनील कदम म्हणाले, कदमवाडी येथील रि. स. नं. २१६ या जागेमध्ये वैयक्तिक लेआऊट असताना त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून गटर्स, रस्ते करण्यासाठी खर्च केले. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामधून त्याचे बिलही ठेकेदारामार्फत उचलण्यात आले आहे; पण गेल्याच महिन्यात हेच रस्ते व गटर्स जेसीबी, पोकलॅनच्या साहाय्याने विकसकाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. हे रस्ते मीच खर्च केल्यामुळे मी ते उखडून काढल्याचे त्याच विकसकाने सांगितले. विशेष म्हणजे, त्या विकसकाने या रस्ते, गटारीच्या कामात खर्च केल्याच्या पावत्या टॅक्स कार्यालयात दाखविल्या आहेत. मग आमदार क्षीरसागर यांनी निधी कोठे वापरला, असाही प्रश्न त्यांनी केला आहे.

एकाच विकासकामासाठी विकसक आणि आमदार निधी कसा खर्च दाखविला आहे? याबाबत प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच आमदार क्षीरसागर यांनी कदमवाडी या भागात गेल्या आठ वर्षांत रस्त्यासाठी किती व कोठे खर्च केला याची सविस्तर माहिती द्यावी. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयावर बोलून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.महापालिकेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रते म्हणाले, आमदार निधीतील विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले होते. या कामासाठी महापालिकेमधून शहर अभियंता यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही घेतले आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा